वर्धा,
nitin-gadkari : समाजाच्या स्वास्थ्याकरिता शेतकर्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आवश्यक आहे. शेतकरी सुखी समृद्ध व्हावा. एआयच्या माध्यमातून त्याचे उत्पादन वाढावे. गाव समृद्ध तर शेतकरी समृद्ध हा वसा घेऊन आम्ही नागपूर जिल्ह्यातील बेला हे गाव स्मार्ट व्हीलेज साकारतो आहोत. स्मार्ट शहराप्रमाणे स्मार्ट व्हीलेजही तयार व्हावे, असे मार्गदर्शन केंद्रीयमंत्री व पूर्ती उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले.
नागपूर बाहेर विदर्भातील पहिले वर्धा येथील पूर्ती सुपर बाजारच्या उद्घाटनप्रसंगी आज ६ रोजी ते बोलत होते. व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी आमदार सागर मेघे, पूर्ती उद्योग समुहाचे अध्यक्ष रवी बोरटकर, सचिव राजीव हडप, दीपक सप्तर्षी, संचालक केतकी कासखेडीकर, माजी खासदार रामदास तडस, सुरेेश वाघमारे, सुधीर दिवे, पूूूर्तीचे संचालक भुपेंद्र शहाणे, संदीप जाधव, विवेक तरासे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ना. गडकरी पुढे म्हणाले की, २५ वर्षांपूर्वी सहकार चळवळीच्या माध्यमातून पूर्ती उद्योग समुहाची स्थापना केली. पूर्तीपुढे देशातील मोठमोठे मॉल आले आणि गेले. परंतु, पूर्तीवर असलेल्या ग्राहकांच्या विश्वासाने वाढ होते आहे. पूर्तीच्या माध्यमातून आता सेंद्रीय शेतीतून उत्पादीत मालाची विक्री होते आहे. चिंध्यांपासुन कार्पेट तयार करण्याचा उद्योगही सुरू झाला आहे. त्यातून १५०० पेक्षा जास्त महिलांना रोजगार मिळतो आहे. वाशिम येथेही ३ हजार युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार देण्यासाठी प्रकल्प सुरू झाला आहे. समाजाच्या स्वास्थ्याकरिता शेतकर्यांना मार्गदर्शन देण्याची गरज आहे. बेला येथे स्मार्ट व्हीलेजची संकल्पना आम्ही साकारत आहोत. तेथे ५ लाखात घरासह पाणी आणि वीज फुकट देण्यात येणार आहे. शेतकर्यांनी आता बांबूची लागवड करावी आम्ही बांबू विकत घेऊ असे आवाहन त्यांनी केले. समाजातील सामाजिक भावना कमी होत आहे. कामं करायला कोणी तयार नाही.
प्रामाणिकपणे कामं करणारे माणसं कमी झाली. आमची पिढी आता थकत जात आहे. त्यामुळे नवीन पिढीने पुढे यावे. पूर्तीचे काम केतकी कासखेडीकर पाहत आहे. पैसा कमावणे गुन्हा नाही. पण, आपले पोट भरल्यावर दुसर्याला देण्याचा आनंद मिळतो. सेवा करण्याकरिता पुढे येण्याची गरज आहे. आम्ही कोरोना काळात ऑसिजन वाटले आता कमीत कमी पैशात कॅन्सरचे इन्जेशन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. समाजाच्या सामाजिक उपक्रमातून महिला बचत गट, शेतकर्यांना सोबत घेऊन हा प्रवास सुरू आहे. वर्धेतील पूर्ती बाजारला वर्धेकर प्रतिसाद देतील असा विश्वास ना. गडकरी यांनी व्यत केला.
ना. बावनकुळे यांनी ग्राहकांना स्वस्त साहित्य कसे मिळेल यासाठी पूर्तीची स्थापना करण्यात आली. आता महिला बचत गटांनाही त्याचा फायदा होतो आहे. आम्ही २ हजार महिला बचत गटांना १ लाख रुपये फिरते अनुदान दिले. जिल्हा नियोजनातून रोजगार निर्मितीवरही खर्च व्हावा असे ते म्हणाले. वर्धेतही ५०० महिलांचा बचत गट तयार व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यत केली. ना. डॉ. पंकज भोयर यांनी पूर्तीने विश्वास निर्माण केला आहे. वर्धा मध्यम वर्गीयांचे शहर आहे. पुर्तीमुळे येथे नवीन बाजारपेठ निर्माण होईल असा विश्वास व्यत करून पूर्ती योग्य वेळी वर्धेत आल्याचा आनंद त्यांनी व्यत केला. यावेळी त्यांनी वर्धा महानगर पालिका होण्यासाठी महसूलमंत्री बावनकुळे यांच्या मदतीची गरज असल्याचे ना. भोयर म्हणाले.
कार्यक्रमाला जिल्हा संघ चालक जेठानंद राजपूत, नगर संघ चालक डॉ. प्रसाद देशमुख, संजीव लाभे, माजी आमदार सरोज काशिकर, ज्येष्ठ पत्रकार हरिभाऊ वझूरकर, पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, अनिल जोशी, राजू राठी, वैभव काशिकर, अमोल ढोमणे, विलास कुळकर्णी, आदींसह वर्धेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती