स्ट्राँग रुममध्ये जॅमर लावा

06 Dec 2025 21:10:30
वर्धा, 
atul-vandile : जिल्ह्यातील सहा नगरपालिकांची निवडणूक घोषित झाली. २ डिसेंबर रोजी मतदान होऊ घातले असतानाच आरक्षणाचा मुद्दा पुढे आला आणि विविध याचिका न्यायालयात दाखल झाल्या. दरम्यान, देवळी येथील संपूर्ण तर हिंगणघाट, पुलगाव आणि वर्धा येथील काही प्रभागातील निवडणूक स्थगित करण्यात आली. स्थगित पालिकेतील तसेच काही प्रभागातील मतदान २० डिसेंबर रोजी होऊन सर्व नगरपालिकांची २१ रोजी मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत ईव्हिएम स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी शंका उपस्थित करीत स्ट्राँग रुममध्ये जॅमर लावण्याची मागणी करीत जिल्हाधिकार्‍यांना तसे पत्र पाठविले आहे.
 
 

ATUL 
 
 
 
दीर्घ कालावधीनंतर नगरपालिकांच्या निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी आणि सिंदी रेल्वे या सहा नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. यादरम्यान, अनेक ठिकाणी आक्षेप घेतल्या गेले. आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित झाला. देवळीत ५० टयापेक्षा जास्त आरक्षण असल्याने तेथील संपूर्ण निवडणूकच स्थगित करण्यात आली असून याबाबतची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली. सोबतच वर्धा येथील दोन प्रभाग, हिंगणघाट येथील दोन प्रभाग आणि पुलगाव येथील दोन प्रभागाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. उर्वरित सर्व नगरपालिकांच्या २ डिसेंबर रोजी मतदान होऊन ईव्हिएम स्ट्राँग रुममध्ये पोलिस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या निगराणीत सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत.
 
 
न्यायालयाने स्थगित केलेल्या देवळी तसेच हिंगणघाट, पुलगाव आणि वर्धा येथील काही प्रभागातील निवडणुका २० डिसेंबरला घेऊन सर्वच मतमोजणी २१ डिसेंबरला घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मतदान झालेल्या ईव्हिएम स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत.
मात्र, ईव्हिएमबद्दल अनेकांना शंका असून मशिनमध्ये घोटाळा होण्याची शयता अतुल वांदिले यांनी उपस्थित करीत थेट जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून ईव्हिएम ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये जॅमर लावण्याची मागणी केली. या पत्रावर आता जिल्हा प्रशासनासह निवडणूक अधिकारी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Powered By Sangraha 9.0