मलकापूर,
student raped मलकापूर शहरात एका अल्पवयीन विद्यार्थिनीला नोट्स आणि मार्क वाढवून देण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर व्हिडिओ स्क्रिन रेकॉर्डिंग व्हायरल करून धमकावल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्षकासह एका अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपी मुकेश परमसिंग रबडे (वय ४०, रा. तरोडा, ता. मोताळा) हा परिचित असल्याने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी “नोट्स आणि प्रॅक्टिकल मार्क देतो” असे सांगून तहसील चौकात बोलावले. तेथून त्याने तिला पंचमुखी जवळील एका रूममध्ये नेले. रूममध्ये आरोपीने पिडीतीची मैत्रिणी हिला व्हिडिओ कॉल करून “स्क्रिन रेकॉर्डिंग कर” असे सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर पिडीतीला धमकावून तिची फसवणूक करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला परत सोडताना “प्रकार कोणाला सांगितला तर व्हिडिओ व्हायरल करीन” अशी धमकी दिली गेली. मागील काहीदिवसापूर्वी पीडीतिच्या मैत्रीणने रेकॉर्डिंग व्हायरल केल्याने पिडीतीच्या कुटुंबाच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर पीडित मुलीने वडिलांना सत्य सांगून पोलिसात तक्रार दाखल केली.student raped या प्रकरणी कलम 64(2) (f),64 (2) (m),115(2),351(2),3(5). BNS सहकलम 4,6 पोस्को सहकलम 67 मा व तंत्रज्ञान अधिनियम अन्वये पोस्क कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दाखल अधिकारी पोहेका शरद मुंडे असून तपास पोनि गणेश गिरी हे करीत आहेत. घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षकाच्या भूमिकेतून अशा प्रकारची