टिप्परची दुचाकीला धडक; काकूसह पुतण्याचा मृत्यू

06 Dec 2025 21:40:23
गोंदिया, 
accident-gondia : भरधाव टिप्परने मोपेड दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार काकूसह चार वर्षीय पुतण्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार ६ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास गोंदिया-बालाघाट मार्गावरील बालाघाट टी पाइंटवर घडली. संध्या मनीष तुपट (३५), रा. कांद्री ता. मोहाडी जि. भंडारा ह. मु. अंगुर बगीचा रोड मोहबे हॉस्पिटलजवळ गोंदिया असे काकूचे तर शिवांश राजेश तुप्पट ( ४), रा. कांद्री ता. मोहाडी, जि. भंडारा असे मृत पुतण्याचे नाव आहे.
 
 
 
संग्रहित फोटो
 
 
 
शनिवारी सायंकाळी संध्या तुप्पट या एमएच ३५ एयू ६९०१ क्रमांकाच्या मोपेडने शिवांशला घेऊन अंगुरबगीचाकडे जात होत्या. दरम्यान, बालाघाट टी पाइंटवर त्या विरुद्ध दिशेने त्याची मोपेड वळवित असताना भरधाव टिप्पर क्रमांक एमएच ३५ एजे ९४९७ ने मोपेडला जोरदार धडक दिली. यात संध्या व शिवांग गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी धाव घेत जखमींना त्वरित गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी दोघांनाही तपासून मृत घोषीत केले. घटनेसंदर्भात टिप्पर चालकावर रामनगगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंद केला आहे.
Powered By Sangraha 9.0