जिपची निवडणूक दुसर्‍या टप्प्यात होण्याची शक्यता

06 Dec 2025 19:17:24
वर्धा, 
zilla-parishad-election : जिल्ह्यातील ५ नगरपालिकांसाठी २ डिसेंबरला मतदान पार पडले. आता सर्वांच्या नजरा मिनीमंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे लागल्या आहे. निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोग केव्हा जाहीर करतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आरक्षणाची जास्तीत जास्त मर्यादा ५० टके असून वर्धा जिपने ओलांडली आहे. गट व गणांचे आरक्षण ५३.८२ इतयावर पोहोचले आहे. आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या पहिले व मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद नंतर असे काही धोरण निवडणूक आयोगाने स्वीकारल्यास वर्धा जिपची निवडणूक दुसर्‍या टप्प्यात होण्याची शयता वर्तविली जात आहे.
 
 
ZP
 
स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षणाचा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर अद्यापही ठोस निर्णय न्यायालयाने दिला नाही. न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोग आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांसाठी वेगळा निवडणूक कार्यक्रम होण्याची शयता नाकारता येत नाही. वर्धा जिल्हा परिषदेतील आरक्षण ५३.८२ टयांपर्यंत पोहोचले असल्याने वर्धा जिल्हा परिषदेची निवडणूक दुसर्‍या टप्प्यात होण्याची शयता वर्तवली जात आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्यासोबत चर्चा केली असता निवडणूक आयोगाकडून कोणत्याही सूचना आल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
पं.स.मध्ये ओलांडले आरक्षण
 
 
जिल्हा परिषद सोबतच वर्धा जिल्ह्यातील ३ पंचायत समित्यांच्या जागांवर देखील आरक्षणाची मर्यादा पार झाली आहे. आर्वी पंचायत समिती ५८.३३ टके आरक्षण, वर्धा पंचायत समिती ५३.५७ टके आरक्षण आणि देवळी पंचायत समिती ५८.३३ टके आरक्षण अशी स्थिती आहे. या तिन्ही पंचायत समित्यांमध्ये आरक्षण ५० टकेच्या मर्यादेपेक्षा जास्त गेले आहे. ज्यामुळे निवडणूक आयोग या भागांमध्ये दुसर्‍या टप्प्यात निवडणुका घेण्यावर विचार करण्याची शयता वर्तवण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0