तभा वृत्तसेवा
मारेगाव,
moregaon-bus-station : मागील अनेक वर्षांपासून बसस्थानकाची प्रतीक्षा असलेल्या मारेगावकरांची प्रतीक्षा अजूनही पूर्ण झालेली नाही. बसस्थानकाचे काम अजूनही अर्धवटच असल्याने आणि अर्धवट असलेले काम सध्या बंद स्थितीत असल्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहत रस्त्यावरच ताटकळत उभे राहावे लागते आहे.
मारेगाव येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. तेव्हा येथे असलेले घाण आणि कचèयाने माखलेले बसस्थानकाचे शेड पाडण्यात आले. तेव्हापासून प्रवासी बसस्थानकाच्या अभावामुळे रस्त्याच्या कडेला, तर कधी दुकानाच्या अडोशाला उभे राहून बसची प्रतीक्षा करीत आहेत.
राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांच्या आंदोलन आणि उपोषणाने अखेर तत्कालीन आमदार संजयरेड्डी बोदकुरवार यांनी मारेगाव येथे बसस्थानकासाठी जागा आणि निधी मंजूर केला. गाजावाजा करीत उद्घाटन झाले. कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला कामही जोमात सुरू झाले. बसस्थानकावर स्लॅबही पडला. परंतु नंतर पाणी कोठे मुरले हे कळले नाही. मागील तीन5चार महिन्यांपासून या बसस्थानकाचे काम बंद अवस्थेत आहे. त्यामुळे पुन्हा प्रवाशांना बसची वाट बघत रस्त्यावरच उभे राहावे लागत आहे.