नागपूर,
cold-wave-nagpur : जम्मू-काश्मीर, दिल्ली, पंजाब, झारखंडपर्यंत थंड लाटेची स्थिती निर्माण झाली असताना आता नागपूरचा पारा घसरला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच थंडीने जोर पकडला आहे. दोन दिवसांपासून घसरणारा नागपूरचा पारा शनिवारी ९.६ अंशांवर आला आहे. शुक्रवारी १०.८ अंशांवर होता. पारा घसल्यामुळे गारठ्यात वाढ झाली आहे. नागपूरचे रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा २.३ अंशांने कमी होते. गोंदियाचा पारा ९.८ अंशांवर आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह विदर्भात थंडी वाढू लागल्याने स्वेटरच्या बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. हवामान विभागाच्या हिवाळी अधिवेशन काळात तापमानाची घसरण कायम राहणार आहे. नागपूरसह विदर्भाला थंडीच्या लाटेचा सामना पुढील काही दिवस करावा लागणार आहे. गत महिन्याभरापासून थंडीला सुरुवात झाल्यानंतर डिसेंबरमध्ये थंडी लाट दिसून येत आहे. डिसेंबरच्या पहिल्या दोन दिवसांत पारा चढल्यानंतर आता पुन्हा कमी झाला आहे. बुधवारपासून थंडी वाढायला सुरुवात झाल्याने पुढील काही दिवस सामना करावा लागणार आहे.