लाख (रा) येथे शंकरपटाचा थरार

06 Dec 2025 20:22:35
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
shankarpat : तालुक्यातील लाख (रायाजी) येथील रॉयल शेतकरी मित्र मंडळाच्या पुढाकारात दत्तजयंती निमित्त शुक्रवार, 5 व 6 डिसेंबर या दोन दिवसात भव्य जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
y6Dec-Shankarpat
 
 
लाख (रा) येथील युवकांनी आयोजित केलेल्या शंकरपटाचे हे पहिलेच वर्ष आहे. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद शंकरपटाला लाभला. महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातून जवळपास दीडशेहून अधिक बैलजोडींची नोंद झाली. या शंकरपटाचे पहिले बक्षीस 31 हजार, दुसरे 21 हजार व तिसरे 11 हजार आहे. अनुक्रमे 12 बक्षीस जाहीर करण्यात आले होते. 1 हजार रुपये नोंदणी शुल्क व तक्रार शुल्क 2 हजार ठेवण्यात आले होते. सहभागी बैलजोडीने 80 मिटरची धावपट्टीवर 5 व 6 सेकंदात पार पाडत हा थरारक शंकरपट उपस्थितांनी अनुभवला.
 
 
याकरिता रॉयल शेतकरी मित्र मंडळाचे मोसीन पठाण, गणेश राठोड, सागर घोरपडे, राहुल पाटील, प्रदीप माकोडे, ओम खोडके, रोहित घोरपडे, सुजीत कोराड, आदित्य पाटील, प्रवीण राठोड व समस्त शेतकèयांनी पुढाकार घेऊन शंकरपट यशस्वी केला.
Powered By Sangraha 9.0