सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा उद्या शुभारंभ

07 Dec 2025 20:56:19
नागपूर,
devendra-fadnavis : देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून वेळप्रसंगी बलिदान देणार्‍या सैनिकांच्या कल्याणासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन जातो. सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवार ८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे.
 
 


cm
 
 
 
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रामगिरी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नागपूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आयोजित या विशेष कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री बावनकुळे, पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभुराज देसाई, वित्त व नियोजन राज्यमंत्री अ‍ॅड. आशीष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
Powered By Sangraha 9.0