‘आई, एखादा श्रीमंत म्हातारा पकड… विधवा असल्याचा फायदा घे’ VIDEO

07 Dec 2025 15:33:18
नवी दिल्ली,  
viral-video सोशल मीडियावर एका आई-मुलीच्या संवादाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, त्यातील मुलीची वक्तव्ये पाहून नागरिक संतापले आहेत. या व्हिडिओमध्ये एक तरुणी आपल्या विधवा आईशी हलक्या-फुलक्या सुरात बोलताना एवढे विचित्र आणि धक्कादायक सुचवते की अनेकांनी तिला ‘बेशरम’ म्हणत चांगलेच सुनावले आहे.
 
 
viral-video
व्हिडिओमध्ये सुरुवातीला मुलगी आपल्या आईकडे हसत-हसत म्हणते, “आई, एखादा श्रीमंत म्हातारा पकड ना… मला ‘शुगर डॅडी’ हवा आहे.” हे ऐकताच आईच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटतात. viral-video पण मुलगी थांबत नाही; ती पुढे म्हणते, “आई, कृपा करून एखादा श्रीमंत म्हातारा शोध. तू विधवा आहेस, त्याचा काहीतरी फायदा करून माझं आयुष्य बरं कर. स्वतःला थोडं का होईना, बलिदान दे आणि मला एक श्रीमंत बाप दे.” आई काही क्षण शांत राहते आणि मुलीचा हात झटकून दूर करते. त्यानंतरही मुलगी चेष्टेच्या सुरातच बोलत राहते. ती म्हणते, “आई, तुझे केस गळतात आहेत… त्यामुळे तुला कुठला श्रीमंत टक्कलवाला मिळाला तर काय वाईट आहे? मला एक श्रीमंत बाप हवा आहे.”
सौजन्य : सोशल मीडिया 
या संपूर्ण संवादाने प्रेक्षक संतप्त झाले असून अनेकांनी मुलीवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांच्या मते, अशा प्रकारच्या चेष्टा केवळ असभ्यच नाहीत तर विधवा महिलेच्या भावनांशी केलेली चेष्टाही आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुलगी नेटिझन्सच्या तीव्र प्रतिक्रियांचा सामना करत आहे.
Powered By Sangraha 9.0