एमडी पावडरसह ड्रग्ज तस्कराला अटक

07 Dec 2025 17:55:25
अनिल कांबळे

नागपूर,
Operation Thunder शहरातील ड्रग्ज विक्री करणारे तस्कर आणि ड्रग्जचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी ‘ऑपरेशन थंडर’ सुरु करण्यात आले. या अभियानाअंतर्गत नंदनवन पाेलिसांनी शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तस्कराला सापळा रचून अटक केली. आराेपीकडून 7 ग्रॅम 88 मिलीग्रॅम वजनाची एमडी (मेेड्राेन) पावडर आणि इतर साहित्य असा एकूण 88 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 

Operation Thunder 
मिळालेल्या माहितीनुसार, युवा पीढी नशेच्या गर्तेतून बाहेर यावी आणि ड्रग्ज तस्करांचा समूळ नाश करण्यासाठी पाेलिस आयुक्त डाॅ.रवींद्रकुमार सिंगल यांनी ‘ऑपरेशन थंडर’ सुरु केले. या अभियानादरम्यान कारवाईचा सपाटा सुरु हाेता. मात्र, काही कर्मचाèयांच्या ‘अर्थपूर्ण’ धाेरणामुळे अजुनही शहरात ड्रग्जविक्री हाेत असल्याची बाब समाेर आली आहे. शनिवारी रात्री नंदनवन पाेलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार हे परिसरात गस्त घालत हाेते. यावेळी त्यांना डी मार्ट समाेरील उड्डाणपुलाखालील राेडवर अंमली पदार्थांची विक्री हाेणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पाेलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला. रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली करणाèया आराेपी ईरान शेख रहीम शेख (32, लेंडी तलाव, बंगाली पंजा, पाचपावली) याला ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये, त्याच्या खिशात अंमली पदार्थ 7 ग्रॅम 88 मिलिग्रॅम एमडी पावडर आढळून आली. पाेलिसांनी हे एमडी पावडर, एक माेबाईल असा 88 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आराेपी ईरान शेख हा स्वत:च्या आर्थिक ायद्याकरिता हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पाेलिसांनी आराेपीविरूद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. मात्र, पाेलिस आयुक्तांचे अभियान सुरु असतानाही ड्रग्जविक्री हाेत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0