रोटरी क्लबचे भव्य रक्तदान शिबिर उद्या

07 Dec 2025 20:30:54
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
blood-donation-camp : रोटरी क्लबद्वारा सोमवार, 8 डिसेंबर रोजी यवतमाळ शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या शासकीय रक्तपेढीत रक्ताचा मोठा तुटवडा भासत असून अनेक गरीब गरजूंना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
 
 
hh
 
 
या अडचणीवर मात करण्याच्या दृष्टीने रोटरी क्लबद्वारा पुढाकार घेऊन यवतमाळ शहरातील तीन ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
आयुर्वेद महाविद्यालय आर्णी मार्ग, वाधवानी फार्मसी कॉलेज धामणगाव मार्ग व आबासाहेब पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा मार्ग येथे सकाळी 9 ते दुपारी 3 दरम्यान इच्छुक रक्तदात्यांना आपल्या सोयीच्या ठिकाणी येऊन रक्तदान करता येईल. प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
 
 
या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ यवतमाळचे अध्यक्ष डॉ. आशिष गवरशेट्टीवार, प्रकल्प अधिकारी अभिजित दाभाडकर, सचिव मोहनसिंह शेर, तुषार पद्मावार व रोटरीचे अध्यक्ष सुनील खडसे यांनी केले.
Powered By Sangraha 9.0