सिंदी पालिकेच्या तिजोरीला लक्ष्मी दर्शन

07 Dec 2025 19:51:16
सिंदी (रेल्वे), 
Sindhi Municipality : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार्‍या १२६ उमेदवारांनी विविध कागदपत्र जुळविताना कोणतीही थकबाकी नसावी यासाठी पालिकेची सर्व थकबाकी अदा केली. याच माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत पाच दिवसात सुमारे १० लाख रुपये जमा झाले.
 
 
JLK
 
निवडणूक आयोगाने काढलेल्या नवीन आदेशानुसार प्रत्येक उमेदवाराच्या नामांकन पत्रासोबत सूचक आणि अनुमोदक म्हणून पाच मतदारांच्या स्वाक्षर्‍या पाहिजेत. त्याशिवाय उमेदवारास अनामत म्हणून ५ हजार रुपये भरावे लागले. त्या नामांकन पत्रावर सही करणार्‍या व्यतीकडे मार्च २०२६ पर्यंतची थकबाकी नसावी, अशी सती करण्यात आली होती. त्यामुळे एका अर्जासाठी सहा नागरिकांना कर अदा करणे अनिवार्य होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अर्ज देणार्‍या १२६ जणांनी घर टॅस तसेच पाणी कर नगर परिषदेला देऊन तसे प्रमाणपत्र नामांकन पत्रासोबत जोडले.
 
 
या उपक्रमात नगर परिषदेकडे घर कराच्या रुपाने ५ लाख ८५ हजार ६९१ रुपये आणि पाणीपट्टी कराचे ४ लाख १३ हजार २१२ रुपये जमा झाले. तब्बल नऊ वर्षांनंतर पालिकेच्या तिजोरीला मोठे लक्ष्मी दर्शन झाल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.
Powered By Sangraha 9.0