वॉशिंग्टन,
trump-and-hegseth-in-trouble व्हेनेझुएलातून अमेरिकेत येणाऱ्या ड्रग्सच्या तस्करीवर अंकुश आणण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. २ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात एका संशयित बोटींवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर हा वाद सुरू झाला. वॉशिंग्टनचे म्हणणे होते की ही बोट ड्रग्स घेऊन अमेरिकेच्या दिशेने येत होती. परंतु नव्या तपासणीत समोर आले आहे की ती बोट अमेरिकेकडे नव्हे तर एका मोठ्या जहाजाकडे जात होती, आणि ते जहाज दक्षिण अमेरिकेतील सुरीनाम या देशाकडे निघाले होते.

एका माहितीनुसार, या कारवाईचे नेतृत्व करणाऱ्या एका ऍडमिरलने सिनेट सदस्यांना स्पष्ट केले की नौदलाने ज्या बोटीवर हल्ला केला, ती बोट कोणत्याही स्थितीत थेट अमेरिकेकडे येत असल्याचे पुरावे मिळाले नाहीत. trump-and-hegseth-in-trouble या हल्ल्यात बोटीवरील ११ जणांचा मृत्यू झाला होता. ट्रम्प यांनी हल्ल्यानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत दावा केला होता की “हे व्हेनेझुएलातून आलेले नर्को-टेररिस्ट होते आणि ते अमेरिकन नागरिकांना मारणारे ‘विष’ अमेरिकेत आणत होते.” तथापि, ऍडमिरलच्या खुलाशानंतर या कारवाईची दिशा बदलली. उपलब्ध माहितीनुसार, बोट एका मोठ्या जहाजाशी संपर्क साधण्यासाठी जात होती. ड्रग्सचे मार्ग कोणत्या वेळेस आणि कुठे वळतात हे निश्चित नसते, परंतु सामान्यतः सुरीनामहून निघणारी तस्करी युरोपकडे जाते, अशी चौकशी संस्थांची नोंद आहे.
या खुलाशानंतर अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण बोट नष्ट करण्याचा आदेश त्यांच्याकडून दिला गेला होता. ऍडमिरलने सिनेटला सांगितले की मिशनचा उद्देश बोटीसह सर्व ११ जणांना संपवणे हा होता, अशी त्यांची समजूत होती. त्यामुळे आता संपूर्ण ऑपरेशनचा मूळ व्हिडिओ जाहीर करण्यासाठी हेगसेथ यांच्यावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. याशिवाय हेगसेथ आधीच एका वेगळ्या प्रकरणात अडचणीत आहेत—सिग्नल चॅटमधून अमेरिकी सैनिकांच्या लोकेशन्स हूती बंडखोरांसमोर उघड केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. trump-and-hegseth-in-trouble अशा स्थितीत ड्रग्स ऑपरेशनविषयीच्या नव्या खुलाशाने त्यांचे संकट आणखी गंभीर झाले आहे.