शनिवारच्या तुलनेत तापमानात १ अंशाने घट

07 Dec 2025 20:09:21
वर्धा, 
wardha-temperature : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात सातत्याने घट होत आहे. अचानक झालेल्या घसरणीमुळे थंडी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी जिल्ह्यातील तापमान ११.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. रविवारी शनिवारच्या तुलनेत किमान तापमानात १ अंशाने घट झाली. रविवारी किमान तापमान १०.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. येत्या काही दिवसांत पारा आणखी घसरण्याची शयता आहे. त्यामुळे लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
 
 
 
K
 
 
 
ऑटोबरमध्ये काळ ढगाळ वातावरण असल्याने थंडी जाणवत नव्हती. नोव्हेंबरमध्ये वातावरणात बदल झाले आणि मध्यम थंडी जाणवू लागली. डिसेंबरमध्ये तापमानात अचानक घट झाली. त्यामुळे थंडीत लक्षणीय वाढ झाली आहे. दिवसा गरमी आणि सकाळी व संध्याकाळी थंडी असते. सकाळी ११ ते दुपारी १२ दरम्यान थंडी सर्वात जास्त असते तर ४ वाजतापासून थंडी जाणवू लागते. वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागात तसेच शहरांमध्ये शेकोट्या पेटवल्या जात आहेत. वाढत्या थंडीमुळे विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत असून लहान मुले आणि वृद्धांची काळजी घेण्याची गरज आहे. वाढत्या थंडीमुळे सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णालयांमध्येही गर्दी दिसून येत आहे.
Powered By Sangraha 9.0