कमरेला दगड बांधून तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

07 Dec 2025 20:40:19
घाटंजी,
suicide-ghatanji : तरुणाने कमरेला दगड बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना 5 डिसेंबर रोजी दहेगाव शेतशिवारात उघडकीस आली. प्रमोद नरसिंग मरापे (दहेगाव) असे मृतकाचे नाव आहे. प्रमोद 30 नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. कुटुंबियांकडून त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, शुक्रवारी अतुल परचेकी यांच्या दहेगाव शिवारातील शेतातील विहिरीत एक मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दुर्गाप्रसाद मिश्रा यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. चौकशीत मृतदेह प्रमोद मरापे यांचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी घाटंजी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मानसिक विंवचनेतून आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मात्र आत्महत्येचे कारण अजूनही समोर आले नाही.
 
 

संग्रहित फोटो 
Powered By Sangraha 9.0