मुंबई
Aamir Khan, बॉलिवूडचा बहुमुखी आणि संवेदनशील अभिनेता आमिर खान याने यावर्षी आपला ६० वा वाढदिवस अत्यंत खास पद्धतीने साजरा केला. वाढदिवसाच्या सणातच त्याने चाहत्यांना एक मोठं आश्चर्य दिलं – तो तिसऱ्यांदा प्रेमात आहे, आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव गौरी स्प्राट असल्याचंही जगासमोर उघड केलं. या घोषणेनंतर पुन्हा एकदा आमिर चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
आमिर दोनदा घटस्फोटित आहे आणि तीन मुलांचा वडील आहे. 1986 मध्ये रिनादत्ताशी केलेलं पहिलं वैवाहिक जीवन 16 वर्षांनी संपलं. त्यानंतर 2005 मध्ये दिग्दर्शिका किरण रावशी विवाहबद्ध झाला, पण हे नातंही 16 वर्षांनी 2021 मध्ये संपुष्टात आलं. दोन वैवाहिक नात्यांमध्ये अपयश आले तरी आमिरनं स्वतःला गोळा करून आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा निर्णय घेतला. अखेर त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची चाहूल लागली, तीही साठीतच.
हिंदुस्तान Aamir Khan लीडरशिप समिट 2025 मध्ये आमिरने या नव्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने बोलत प्रेक्षकांना थक्क केलं. त्यांनी सांगितलं, “मला कधी वाटलं नव्हतं की मी पुन्हा रिलेशनशिपमध्ये असेन. पण गौरीने माझ्या आयुष्यात जी शांतता, प्रेम आणि स्थिरता आणली आहे, ती अवर्णनीय आहे. मी खूप भाग्यवान आहे.” या वेळी त्यांनी आपल्या पहिल्या दोन पत्नींबद्दलही आदराने बोलत म्हटलं, “रिना, किरण आणि आता गौरी या तिघींनी माझं आयुष्य समृद्ध केलं आहे. माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. माझी दोन लग्नं टिकली नाहीत, याचं दुःख नाही; उलट त्या प्रवासांनी मला आजचं प्रेम दिलं.”गौरी स्प्राट मूळची बेंगळुरूची असून ती कॉर्पोरेट पार्श्वभूमीची, सुशिक्षित आणि खाजगी स्वभावाची महिला आहे. तिची सहा वर्षांची मुलगी आहे. आमिर आणि गौरी अनेक वर्षांपासून परिचित होते, परंतु प्रेमाची ठिणगी अलीकडेच पडली. दोघांच्या साधेपणा आणि परिपक्वतेमुळे ते एकमेकांच्या अधिक जवळ आले आहेत.दोन्ही नाती संपल्यानंतर आमिरने स्वतःवर लक्ष केंद्रित करून आयुष्यात शांतता शोधली आणि या काळात गौरीसोबतचा संबंध अधिक दृढ झाला. आज दोघंही आयुष्याचा प्रत्येक क्षण परिपक्वतेने आणि आनंदाने जगत आहेत. आमिरच्या या प्रामाणिक, उघड आणि धाडसी स्वीकृतीमुळे मुलाखत सध्या देशभर चर्चेत आहे.साठीत प्रेमात पडलेला आमिर पुन्हा एकदा दाखवतो की, नाती कधी संपतात, तर कधीकधी नवं आयुष्य त्या क्षणापासून सुरू होतं.