बंजारा - भटके समाजाचा विधानभवनावर हल्लाबोल आंदोलन

08 Dec 2025 17:34:23
मानोरा,
Banjara Bhatke community protest शासनाकडून बंजारा, भटके - विमुक्त तसेच अभावग्रस्त बहुजन समाजाच्या विविध मागण्यांकडे होत असलेल्या सातत्यपूर्ण दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त करत ११ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधानभवनावर न्याय मागण्यांसाठी हल्लाबोल आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा करणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.
 

Banjara Bhatke community protest 
अखिल भारतीय Banjara Bhatke community protest तांडा सुधार समितीने मागील २५ ते ३० वर्षांत रस्ता रोको, आक्रोश मोर्चे, घेराव आणि संघर्ष पदयात्रा अशा लोकशाही मार्गाने असंख्य आंदोलनांची मालिकाच उभारली. तरी देखील शासन संवेदनशून्य राहिल्याचा आरोप समितीने केला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी थाळी -नंगारे आणि डपड्यांच्या गजरात मोठ्या जनसमुदायासह विधानभवनावर ही मोहीम उभारणार आहेत. आंदोलनातील प्रमुख मागण्यामध्ये आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता बंजारा व भटके विमुक्त समाजाला आदिवासी आरक्षणासाठी समिती, आयोगाची नियुक्ती, २०१७ चा रक्त नात्याचा जीआर रद्द करून विमुक्त (अ) प्रवर्गातील अवैध घुसखोरी रोखण्यासाठी एसआयटी गठीत करणे, बोगस जात स्वतंत्र तात्काळ प्रमाणपत्राधारक उमेदवारांविरुद्ध दाखल तक्रारींची सखोल चौकशी, भटके-विमुक्त समाजावरील नॉन-क्रिमिनलिअरची अट रद्द करणे, जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमधील पटसंख्या अट रद्द करणे, घरकुलासाठी अनुदान ६ लाखांपर्यंत वाढविणे, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनांमध्ये मानधनवाढ, ३० वर्षांपासून वहीतीवर शेती करणार्‍यांना मालकी हक्क मंजूर करणे, सर्व गावांमध्ये स्मशानभूमी व स्मशानशेड, वाचनालय, अभ्यासिका व बिरसा मुंडा व्यायामशाळा उभारणी, वसंतराव नाईक विकास महामंडळाचे कर्ज १० लाखांपर्यंत वाढवून दोन जामीनदारांची अट रद्द करणे, कलावंत, शाहीर, भजनकरी यांच्या मानधनात वाढ, शेतकर्‍यांसाठी संपूर्ण कर्जमाफी व हमीभाववाढ आदीसह अनेक मागण्यांचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0