गोमांस आणि जनावरांचे कापलेले पाय जप्त

08 Dec 2025 17:20:18
कर्नाटक,
Mandya district Srirangapatna कर्नाटकातील मांड्या जिल्यात गोमांस तस्करीचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. श्रीरंगपट्टण तालुक्यातील पश्चिमवाहिनी परिसरात रविवारी उशिरा रात्री तपासणीदरम्यान पोलिसांनी एका मालवाहक वाहनातून मोठ्या प्रमाणात गोमांस आणि जनावरांचे इतर अवयव जप्त केले. या प्रकरणी वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.
 

Mandya district Srirangapatna 
पोलिसांच्या माहितीनुसार, हुनसूरहून रामनगरकडे जाणारे हे वाहन स्थानिक हिंदू संघटनांच्या सदस्यांच्या नजरेस आले. संशय आल्याने त्यांनी वाहन अडवून पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर श्रीरंगपट्टण टाउन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहन जप्त केले. तपासादरम्यान मालवाहू वाहनाच्या आत गोमांस तसेच मवेश्यांचे पाय सापडले, ज्यामुळे तस्करीचा संशय अधिक बळावला.चालकाला घटनास्थळीच अटक करण्यात आली असून जप्त केलेल्या मांसाचे नमुने तपासासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत Mandya district Srirangapatna  पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी कर्नाटक गोहत्या निवारण आणि पशु संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी गोमांसाची ही खेप कुठून आणली होती आणि ती कोणाकडे पाठविली जाणार होती, याचा तपास सुरू केला आहे. तस्करीचे जाळे उघड करण्यासाठी पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Powered By Sangraha 9.0