बॉयफ्रेंडसोबत रोमान्सचा करत असताना अचानक आली बायको....video

08 Dec 2025 13:01:40
बीजिंग,
Beijing social media video चीनमध्ये एका गगनचुंबी इमारतीत घडलेला धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत एका तरुणीला तिच्या कथित बॉयफ्रेंडने १०व्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीबाहेर लटकवले. माहिती अशी की, तरुणी आपल्या बॉयफ्रेंडच्या घरात आली होती, त्यावेळी अचानक प्रियकराची बायको घरी आली आणि घाबरलेल्या प्रियकराने तरुणीला बाल्कनीबाहेर लटकवले.
 

chaina
 
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुणी रेलिंगला पकडून लटकलेली दिसत आहे. तिच्या हातात मोबाईल आहे आणि समोरच्या इमारतीतून कोणीतरी तिचा व्हिडिओ शूट करत असल्याचे दिसते. काही वेळाने तरुणी धाडस दाखवत ड्रेनेज पाइप आणि खिडक्यांना पकडून खाली उतरायला प्रयत्न करते. ही घटना सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय बनली असून लोक तिच्या धाडस आणि भीतीदायक परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0