भुमराळा–किनगाव मार्गावरील खड्ड्यांचे ‘पुजन’ करून आंदोलन

08 Dec 2025 17:21:50
बुलढाणा,
Bhumrala-Kingav road भुमराळा ते किनगावजटटू या महत्त्वपूर्ण डांबरी रस्त्याची दयनीय अवस्था सुधारण्यास संबंधित ठेकेदार व विभाग पूर्णपणे असमर्थ ठरत असून नागरिकांची प्रचंड हालअपेष्टा सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपा सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष देवानंद सानप यांनी रस्त्याची गंभीर दुरवस्था लक्षात घेऊन ठेकेदार व विभागीय अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला होता त्वरित दुरुस्तीचे काम सुरू करा, अन्यथा आंदोलन केले जाईल.
 

Bhumrala-Kingav road  
भाजपा जिल्हाध्यक्ष देवानंद सानप यांची प्रशासनाला ठणकावणी
मात्र, दिलेल्या इशाऱ्याला Bhumrala-Kingav road कोणतीही दखल न घेता संबंधितांनी दोन आठवडे उलटूनही काम सुरू केले नाही. त्यामुळे आज देवानंद सानप यांनी अनोख्या पध्दतीने आंदोलन छेडले.यामध्ये त्यांनी रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांचे आणि ठेकेदाराने तीन किलोमीटर टाकलेल्या गिट्टीच्या गंजाचे पुजन करून गणपती बाप्पाची आरती म्हणत आंदोलन केलेया अनोख्या आंदोलनाला परिसरातील नागरिकांचीही मोठी गर्दी जमली आणि सर्वांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.सदर मार्गावरील खोल खड्ड्यांमुळे व टाकुन ठेवलेल्या गिट्टी च्या गंजामुळे दररोज छोटे मोठे अपघात सुरुच आहे शालेय विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक यांचे मोठे हाल सुरूच आहेत. अनेक तक्रारी करूनही दुरुस्तीचे काम न सुरू केल्याने सानप यांनी आजचा आगळावेगळा मार्ग अवलंबला.सानप म्हणाले दोन वर्षे रस्ता दुरुस्तीचा प्रश्न तसाच आहे. ठेकेदार व संबंधित विभागाचे अधिकारी झोपेलेल्या अवस्थेत आहेत. जर आता तरी काम सुरू झाले नाही, तर आणखी मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे
 
 
नागरिकांमध्ये या Bhumrala-Kingav road आंदोलनाची मोठी चर्चा असून आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यावेळी भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण धाईत, युवा मोर्चा जिल्हा सचिव राम डुकरे, भाजपा तालुका सरचिटणीस भागवत मुळे,ता उपाध्यक्ष वैभव कापकर, सामाजिक कार्यकर्ते इमरान पठाण, नवनाथ चौधरी गणेश सरकटे, शरद पोखरकर,सह भुमराळा , वझरआघाव, किनगाव जटटू येथिल शेकडो गावकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला
Powered By Sangraha 9.0