‘तू देखेंगी और फिनाले में खड़ी होकर तालियां बजाएंगी मेरे लिए…

08 Dec 2025 11:31:58
मुंबई,
Gaurav Khanna सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’च्या ग्रँड फिनालेमध्ये गौरव खन्नाने विजेतेपदावर आपले नाव कोरलं. अंतिम क्षणी गौरव आणि फरहाना भट्ट आमनेसामने उभे असताना, सलमानने गौरवचं नाव विजेता म्हणून जाहीर केलं आणि रनरअप ठरलेली फरहाना गौरवसाठी टाळ्या वाजवत उभी राहिली. काही आठवड्यांपूर्वी एका टास्कदरम्यान गौरवनेच तिला दिलेली “तू फिनालेत उभी राहून माझ्यासाठी टाळ्या वाजवशील” ही भविष्यवाणी अक्षरशः खरी ठरली.
 
 

Gaurav Khanna  
गौरवचा प्रवास Gaurav Khanna सुरुवातीपासूनच संयम, शांतता आणि सकारात्मक नेतृत्वाने भरलेला होता. पहिल्या आठवड्यातच त्याने घरातील ‘पॉझिटिव्ह ग्रुप’ची सूत्रे आपल्या हातात घेतली. प्रणीत मोरे, अभिषेक बजाज, अशनूर कौर, आवाज दरबार, नगमा आणि मृदुल तिवारी या सहकाऱ्यांना तो नेहमी मार्गदर्शन करत असे. कोणत्याही कॅप्टनसी टास्कमध्ये त्याच्या टीममधील एखाद्याला संधी मिळावी हे त्याचं ठाम मत होतं, आणि त्यामुळे त्याला घरात नैसर्गिक नेता म्हणून ओळख मिळत गेली.
 
 
शोमध्ये सुरुवातीला Gaurav Khanna झिशानला ‘मास्टरमाइंड’ मानलं जात होतं, मात्र कथानक वळणं घेत असताना गौरवने स्वतःचा स्वतंत्र, संतुलित आणि सर्वसमावेशक खेळ मांडला. कोणत्याही विशिष्ट गटापुरता मर्यादित न राहता, त्याने प्रत्येक स्पर्धकाशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही उच्च-नाट्यमय किंवा भडक प्रसंगांमध्येही त्याने संयम सोडला नाही; चिथावणी मिळूनही त्याच्या प्रतिक्रिया नेहमीच मोजक्या आणि विचारपूर्वक असत. घरात दोन मोठे गट असूनही, 16 स्पर्धकांपैकी कोणासोबतही त्याचे भडक वाद किंवा कटुता दिसली नाही. यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला आणि त्याच्या खेळाला व्यापक पाठिंबा मिळाला.सलमान खाननेही अनेकदा गौरवच्या संतुलित खेळाचं कौतुक केलं होतं. “गौरवचा गेम सुरुवातीपासून एकसारखा आहे. त्याने कधीच कोणाशी जबरदस्तीची भांडणे केली नाहीत. जर हेच त्याचं खऱ्या आयुष्याचं व्यक्तिमत्व असेल, तर ते खरंच प्रशंसनीय आहे,” असं मत सलमानने व्यक्त केलं होतं. हा संकेतही प्रेक्षक आणि घरातील सदस्यांमध्ये गौरवच्या बाजूने वातावरण तयार करणारा ठरला.
शांत, सुजाण, सकारात्मक आणि प्रामाणिक खेळ हीच गौरव खन्नाच्या विजयी प्रवासाची खास खूण ठरली. तणाव, भांडणं आणि आरोप-प्रत्यारोपांनी भरलेल्या ‘बिग बॉस’च्या घरात संयम राखूनही खेळ जिंकता येतो, हे गौरवने सिद्ध केलं. फिनालेत ट्रॉफी हातात घेताना त्याच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्याच्या टीमच्या सदस्यांचा अभिमान, ‘बिग बॉस 19’चा हा सीझन लक्षात राहण्यासारखा बनवून गेला.
Powered By Sangraha 9.0