नवी दिल्ली,
buddhist-baramulla-discovery काश्मीरच्या बारामुलामध्ये जीपीआरच्या (gpr) मदतीने जमिनीखाली दडलेल्या प्राचीन बांधकामांचे संकेत मिळाल्यानंतर खोदकाम सुरू करण्यात आले. या खोदकामात संशोधकांच्या चमूला 3 स्तूप, बांधकामातील भिंती, मातीची भांडी, कलानुसर केलेल्या तांब्याच्या वस्तू आणि इतर बौद्ध अवशेष सापडले आहेत.
buddhist-baramulla-discovery उत्तर काश्मिरातील बारामुला जिल्ह्यातील जेहनपोरा येथे कुषाणकालीन बौद्ध वस्तीचे अवशेष सापडले आहेत. या शोधामुळे काश्मिरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहास आणखी समृद्ध झाला असून, नवीन संशोधनाला यामुळे दिशा मिळणार असल्याचे संशोधकांचे मत आहे. हे संशोधन पुरातत्त्व विभाग, संग्रहालय विभाग आणि काश्मिर विद्यापीठाच्या मध्य आशियाई अध्ययन विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून करण्यात आले आहे.
buddhist-baramulla-discovery पाच महिने चाललेल्या या खोदकामात राजतरंगिणी, ऐतिहासिक यात्रा वृत्तांत आणि जीपीआर अर्थात ग्राऊंड पेनेट्रेटिंग रडारसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यासोबतच, खोदकामादरम्यान डिजिटल मॅपिंग, ड्रोन सर्वेक्षण आणि 3 डी डॉक्युमेंटेशन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येतो आहे. काश्मिर खोèयात पहिल्यांदाच कुषाणकालीन बौद्ध वस्तीचे इतके जास्त पुरावे सापडले आहेत.