चंद्रपूर,
chandrapur-railway-pune पुणे व मुंबई दैनंदिन रेल्वे गाडी सुरू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी चंद्रपूर रेल प्रवासी सेवा संस्थेकडून शनिवारपासून येथे उपोषण सुरू आहे. हे उपोषण आंदोलन तीन दिवस चालणार असे ठरले होते. मात्र, दुसर्या दिवशी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. तत्पूर्वी, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून, संस्थेला पुणे व मुंबईसाठी दैनंदिन रेल्वे गाडी सुरू करण्याविषयी ठोस आश्वासन दिले.
(उपोषण मंडपाला भेट देऊन चर्चा करताना शोभाताई फडणवीस)
chandrapur-railway-pune लवकरच संस्थेच्या पदाधिकार्यांसोबत शोभाताई फडणवीस दिल्लीला येणार आहेत. या त्यांच्या आश्वासक भूमिकेनंतर आणि त्यांच्याच विनंतीनंतर उपोषण शनिवारीच थांबवले आणि आज ठरल्याप्रमाणे आंदोलनाची सांगता केली, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष दामोधर मंत्री यांनी सांगितले. दरम्यान सोमवारी, आंदोलनाच्या तिसर्या दिवशीपर्यंत 170 सामाजिक व अन्य क्षेत्रातील संघटनांनी या मागणीला पाठींबा जाहीर केला. माजी केंद्रिय मंत्री हंसराज अहिर यांनीही उपोषण मंडपाला भेट देऊन ही समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
गांधी चौकातून उपोषण मंडपापर्यंत मोटारसायकल रॅली chandrapur-railway-pune
(गांधी चौकात घोषणा देताना संस्थेचे पदाधिकारी)
chandrapur-railway-pune सोमवारी सकाळी गांधी चौकातून उपोषण मंडपापर्यंत पैदल मार्च करण्यात येणार होते. मात्र, वेळेवर त्यात थोडा बदल करून, गांधी चौकातून उपोषण मंडपापर्यंत मोटासायकल रॅली काढण्यात आली. तत्पूर्वी, सर्व पदाधिकारी व समर्थक संस्थांच्या पदाधिकार्यांनी गांधी चौकात एकत्र येत, वंदे मातरम, भारत माता की जय आणि आमची रेल्वे गाड्यांची मागणी मंजूर करा, अशा घोषणा दिल्या.