नागपूर,
Santaji Rally संताजी समता परिषदेच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात महाजन आटा चक्कीपासून झाली आणि ठरलेल्या मार्गानंतर जवळ कॉलेजच्या मागील मैदानात यशस्वीरित्या समापन झाले. प्रारंभी शिरोमणी संताजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.
रॅलीमध्ये दीडशे ते दोनशे नागरिक सहभागी झाले. Santaji Rally किशोर चन्ने यांच्या अध्यक्षतेखाली रॅली पार पडली, प्रस्ताविक संदीप बुटले आणि संचालन नीलिमा वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक समाज बांधव उपस्थित होते.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र