बिग बॉस १९ चा विजेता ठरला गौरव खन्ना

08 Dec 2025 09:59:20
मुंबई,
gaurav khanna कलर्स टीव्हीच्या लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉसच्या १९ व्या सीझनचा विजेता गौरव खन्ना ठरला आहे. शोचे होस्ट सलमान खान यांनी विजेत्याचे नाव जाहीर केले. गौरव खन्नाला बिग बॉसची ट्रॉफी आणि ५० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. तर फरहाना भट्ट या या सीझनच्या रनर अप ठरल्या.
 
bb
 
 
या सीझनची थीम ‘घरवाल्यांची सरकार’ होती. हा सीझन २४ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू झाला आणि ७ डिसेंबरला ग्रँड फिनालेसह संपला. तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या शोमध्ये विजेत्याची घोषणा केली गेली. सलमान खान यांनी या सीझनमध्येही एक सदस्याला ट्रॉफीसह बक्षीस देऊन सन्मानित केले.
बिग बॉसच्या घरात गौरव खन्नाने सुरुवातीपासूनच ठळक कामगिरी केली. त्यांची खेळण्याची पद्धत आणि रणनीती अशी होती की प्रेक्षक भावनिक झाल्याशिवाय राहू शकले नाहीत. घरातल्या जर्नीमध्ये त्याने गेमचे कौशल्य दाखवून फॅन्सचे मन जिंकले. फक्त रणनीती नव्हे, तर त्यांच्या बुद्धीमत्तेमुळे आणि परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतीमुळे त्यांचे नाव चर्चेत राहिले. सलमान खान यांनीही त्यांच्या खेळाचे कौतुक केले.
टीव्हीवरील अनेक लोकप्रिय सिरीयल्समध्ये गौरव खन्ना दिसला आहे. बिग बॉस १९ मध्ये त्याने ‘सायलेंट बट डेडली’ अशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी दाखवली.gaurav khanna प्रणित मोरे आणि मृदुल तिवारीसह त्याची मैत्री आणि बॉन्डिंगही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. घराबाहेर आणि घरातही त्याची वैयक्तिक आणि खेळातील जर्नी चर्चेचा विषय ठरली.
विजेत्या ट्रॉफीसह गौरव खन्नाला ५० लाखांचा बक्षीसही मिळाले. प्रत्येक सीझनमध्ये प्रेक्षकांना विजेत्याच्या घोषणेची उत्कंठा असते, आणि या वर्षी गौरव खन्नाने ती उत्कंठा पूर्ण केली. या सीझनमध्ये कोणत्याही टास्क दरम्यान प्राइज मनी कमी केली गेली नाही आणि विजेत्याला संपूर्ण बक्षीस दिले गेले.
Powered By Sangraha 9.0