रावलकोटमध्ये लष्कर-ए-तैयबाचा नवा लाँच पॅड! फोटो व्हायरल

08 Dec 2025 16:39:02
इस्लामाबाद,
Lashkar-e-Taiba's new launch pad in Rawalpindi पाकिस्तान कधीही शांततेच्या मार्गावर येईल का किंवा दहशतवाद सोडेल का, असा प्रश्न कायमच विचारला जातो. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले, ज्यात पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र, आता पाकिस्तान पुन्हा या तळांना पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नात आहे. पीओकेतील रावलकोटमध्ये लष्कर-ए-तैयबा जिहादींसाठी नवीन लाँच पॅड उभारला जात आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लाँच पॅड म्हणजे दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्यापूर्वी अंतिम तयारीसाठी वापरणारी जागा. ही जागा दहशतवाद्यांसाठी प्रवेशद्वार म्हणून देखील काम करते.
 
 
launch pad in Rawalpindi
 
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर ऑपरेशन सिंदूर राबवले होते. मात्र, आता लष्कर-ए-तैयबा पीओकेमधील रावलकोटमध्ये मरकझ नावाखाली दहशतवादी लाँच पॅड तयार करत आहे. रावलकोटमधील खैगाला येथे बांधल्या जाणाऱ्या या इमारतीला अल-अक्सा मरकझ म्हणून दुहेरी वापराचे स्वरूप दिले जात आहे, जिथे लष्कर त्याच्या दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थाने आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करत आहे. व्हिडिओमध्ये लष्करचा पीओके प्रवक्ते आमिर झिया सुरुवातीला या इमारतीला मशीद म्हणतो, पण नंतर चुकीने मरकझ असल्याचे कबूल करतो, ज्यामुळे खरा उद्देश स्पष्ट होतो. एलईटी पीओकेच्या विविध भागात सातत्याने लहान लाँच पॅड्स आणि आश्रयस्थाने तयार करत आहे.
 
 
 
यासोबतच पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांच्या उच्चस्तरीय बैठकींचेही फोटो समोर आले आहेत. ६ नोव्हेंबर रोजी बहावलपूरमध्ये झालेल्या या बैठकीत अनेक जिहादी कमांडर्स उपस्थित होते. बैठकीत लष्कर-ए-तैय्याचा उपप्रमुख सैफुल्लाह कसुरीही दिसतो. भारताच्या ऑपरेशन सिंदूरपूर्वीही बहावलपूरमध्ये अशीच बैठक झाली होती, हे लक्षात घेण्यासारखे आहे. सध्याची परिस्थिती स्पष्ट करते की पाकिस्तान दहशतवादाच्या मार्गावरून पूर्णपणे दूर नाही आणि देशातील दहशतवादी संघटनांना अजूनही संरक्षण व मोकळीक मिळत आहे.
Powered By Sangraha 9.0