माऊली सेवा मित्र मंडळाची शेतकऱ्यांसाठी मदत

08 Dec 2025 14:02:54
नागपूर,
Mauli Seva Mitra Mandal गोंदिया जिल्ह्यातील मुरकुट डोह परिसरात, जो संवेदनशील नक्षलग्रस्त भाग आहे तिथे शेतकऱ्यांसाठी आणि गरजू लोकांसाठी माऊली सेवा मित्र मंडळाने सामाजिक उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत दोन गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी फवारणी पंप, थंडीच्या काळासाठी ब्लँकेट, महिलांसाठी साड्या, मुलांसाठी ड्रेस तसेच खाऊ यांचे वाटप करण्यात आले.
 Mauli Seva Mitra Mandal
 
हा कार्यक्रम अमर स्वरूप फाउंडेशन, नागपूर, रोटरी क्लब डाऊन टाऊन नागपूर आणि गोंदिया पोलीस दल यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक भामरे साहेब, अ‍ॅडिशनल एसपी डोंगरे साहेब, तसेच मुरकुट डोहचे चेतन ढाकणे साहेब यांच्या सहकार्याने पार पडला. Mauli Seva Mitra Mandal माऊली सेवा मित्र मंडळाचे सदस्य सुहास खरे, मनोज चावरे, मनोहर तारसे, कर सुरेंद्र खरे यांच्या सक्रिय सहभागाने हा उपक्रम यशस्वी झाला. सर्व दानदात्यांचे आणि सहकार्य करणाऱ्यांचे माऊली सेवा मित्र मंडळाने विशेष आभार व्यक्त केले आहेत.
सौजन्य: सुहास खरे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0