मेट्रोकडून बटुकभाई ज्वेलर्सने खरेदी केले १०० महाकार्ड

08 Dec 2025 18:16:25
नागपूर,
Nagpur Metro सार्वजनिक वाहतुकीकडे नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी नागपूर मेट्रोने पुढाकार घेत स्थानिक व्यावसायिक बटुकभाई ज्वेलर्स यांच्यासोबत करार केला आहे. नागपूर मेट्रोचा प्रवास अधिक सुलभ, व्हावा हा यामागील उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत ग्राहकांना भेटस्वरूप देण्यासाठी नागपूर मेट्रोकडून १०० महाकार्ड खरेदी केले आहेत. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांनी १०० महाकार्ड बटुकभाई ज्वेलर्सला प्रदान केले असून नागपूर मेट्रोकडे स्थानिक व्यावसायिक समुदायाचा विश्वास वाढत आहे.
 

Nagpur Metro, Mahacard purchase, Batukbhai Jewelers, 
दरम्यान नागपूर मेट्रोच्या अधिकार्‍यांनी महाकार्डचे फायदे संवाद कार्यक्रमात सांगितले आहे. स्मार्ट कार्डचा प्रवास अधिक सोपा, रोकड विरहित व्हावा,यासाठी प्रत्येक प्रवासावर १० टक्के सूट दिल्या जात आहे. तर विद्यार्थ्यांसाठी ३०टक्के प्रवास सवलत उपलब्ध होते.
Powered By Sangraha 9.0