नागपूर,
Nagpur special train प्रवाशांची गर्दी वाढल्याचे लक्षात विशिष्ट ठिकाणाहून विशिष्ट रेल्वे त्या त्या ठिकाणाहून सोडल्या जाणार आहे. प्रवाशांकडून मागणी झाल्यास भारतीय रेल्वेकडून ट्रेन ऑन डिमांड सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने या संबंधाने माहिती दिली असून, नागपूर, बंगळुरू, दिल्लीसह सहा ठिकाणांहून १४ स्पेशल ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.
सण उत्सवांमुळे वेगवेगळ्या सिझनमध्ये अचानक रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची वाढते. अशात अचानक गर्दी वाढल्याने विविध गाड्यांमध्ये पाय ठेवायला जागा राहात नाही. अशावेळी प्रवाशांना गर्दीचा फटका बसतो. प्रवाशांना सुविधाजनक प्रवास करता यावा, यासाठी रेल्वेकडून स्पेशल ट्रेन चालविण्यात येतात. मात्र, त्यातून काही मार्गावरच्या प्रवाशांनाच दिलासा मिळतो. पाहिजे तसे गर्दीचे नियोजन होत नाही. आता २५ डिसेंबर रोजी नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मार्गावर गर्दी होत आहे. गर्दीतून प्रवाशांची सुटका करुन घेण्यासाठी मध्य रेल्वेने १४ विशेष रेल्वे गाडया चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांना ज्या Nagpur special train शहरात जायचे आहे, अशा राज्यात आरामदायी प्रवासाची सोय होणार आहे. प्रवाशांना या गाड्यांमध्ये एसी फर्स्ट क्लास, एसी टू-टियर, एसी थ्री-टियर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास अशा सर्व समावेश राहणार आहे. नागपूर, मडगाव-गोवा, बेंगळुरू, लखनौ, गोरखपूर आणि हजरत निजामुद्दीन दिल्ली या ठिकाणांवर गर्दी दिसल्यास तेथून ज्या मार्गावर प्रवाशांची मागणी आहे, त्या मार्गावर ही स्पेशल धावणार आहे.