नितीन गडकरी यांच्या सीएसआर फंडातून धानोरा येथे रुग्णवाहिका सुविधा

08 Dec 2025 18:09:48
धानोरा,
Nitin Gadkari गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व दिशेला असलेल्या अतिमागास तालुक्याला रुग्णांच्या सेवेसाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या सीआरसीएस फंडातून रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार डॉ. अशोक नेते, भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ साळवे यांच्या विशेष प्रयत्नातून धानोरा तालुक्यातील नागरिकांना ही विशेष भेट मिळालेली आहे.
 
 

Nitin Gadkari 
धानोरा तालुक्यातील Nitin Gadkari  नागरिकांना त्वरित आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी ही रुग्णवाहिका 24 तासांसाठी ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर अगदी अल्प दरात कार्यरत राहणार आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सारंग साळवे यांनी विशेष लक्ष देऊन, वारंवार मागणी रेटून धरत महत्त्वपूर्ण समन्वय साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांना ही अत्यंत उपयुक्त सुविधा उपलब्ध झाली आहे.या रुग्णवाहिका सुविधेमुळे धानोरा तालुक्यातील रुग्णांना तातडीच्या सेवेसाठी मोठा दिलासा मिळणार असून आरोग्यसेवा व्यवस्थेत सकारात्मक बदल घडणार आहे.
Powered By Sangraha 9.0