विरोधी पक्षनेतेपदावरून ठाकरे गटाची सरकारवर टीका

08 Dec 2025 11:33:49
नागपूर,
Nagpur Assembly session विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज नागपूर येथे सुरुवात झाली असून, यावेळी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याची अभूतपूर्व परिस्थिती आहे. विरोधकांनी सरकारवर जाणूनबुजून ही पदे रिक्त ठेवत असल्याचा आरोप करत टिका चढवली आहे. तर विरोधी पक्षनेते निवडीचा अधिकार सरकारकडे नसून सभापती आणि अध्यक्षांकडे असल्याचे स्पष्टीकरण सत्ताधाऱ्यांकडून देण्यात येत आहे.
 
 

Nagpur Assembly session 
दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसने सतेज पाटील यांचे नाव अधिकृतरित्या पुढे केले असून काँग्रेसचे शिष्टमंडळ सभापती राम शिंदे यांची भेट घेणार आहे.काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर तीव्र हल्ला चढवताना 1980 आणि 1985 मधील उदाहरणांचा दाखला दिला. “त्या काळात भाजपाचे अनुक्रमे 14 आणि 16 आमदार असतानाही त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते. आज मात्र विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेऊन सरकार मनमानी कारभार करत आहे,” अशी टीका त्यांनी केली.
 
 
“संविधानिक Nagpur Assembly session  पद रिक्त ठेवून कामकाज करणे म्हणजे लोकशाहीवर आघात आहे. आम्ही नाव दिलं आहे, मग विरोधी पक्षनेतेपद देण्यात सरकारला काय अडचण? निर्णय घ्या. सरकार लोकशाहीप्रणाली नको म्हणत असेल तर ते संविधानाप्रमाणे राज्यकारभार करण्यास इच्छुक नाहीत, असा अर्थ यातून निघतो,” असा घणाघात करत सरकारला जनतेस न्याय द्यायचा नसल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले.विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्रस्थानी येत असून, पुढील काही दिवसांत या विषयावर मोठा राजकीय कल्लोळ उसळण्याची चिन्हे दिसत आहेत.
 
 
काय म्हणाले जाधव?
 
 
राज्यातील Nagpur Assembly session  विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीचा प्रश्न अधिक चिघळत असताना ठाकरे गटाने सरकारवर जोरदार टीका चढवली आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी दहा टक्के सदस्यसंख्येची कोणतीही अट नाही, असा ठाम दावा करत महायुती सरकारवर टोला लगावला. याबाबत विधीमंडळ सचिवांच्या पत्राचा हवाला देत, सरकार जाणीवपूर्वक प्रक्रिया लांबवत असल्याचा आरोप त्यांनी केला.जाधव म्हणाले, “दहा टक्के सदस्यसंख्येचा उल्लेख कुठेही नाही. आधी विरोधी पक्षनेता निवडीची घोषणा करा. सरकार मुद्दाम वेळकाढूपणा करत आहे.” विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीचा निर्णय प्रलंबित ठेवल्यामुळे विधानभवनातील वातावरण चांगलेच तापले आहे.याच पार्श्वभूमीवर सरकारच्या कार्यपद्धतीवरही जाधवांनी कठोर शब्दांत टीका केली. “रात्री डोळ्याला गॉगल लावून, वेष बदलून सरकार कसं पाडलं हे स्वतः मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं आहे,” असा थेट घणाघात करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला.केंद्राने शक्ती विधेयक नाकारल्याची माहिती मुख्यमंत्र्यांकडूनच मिळाल्याचे त्यांनी सांगत, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. “महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे असलेले विधेयक केंद्राकडे रखडत असताना सरकार शांत का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हिवाळी अधिवेशन केवळ पुरवणी मागण्यांपुरते मर्यादित ठेवत, लोकांच्या अपेक्षांशी विसंगत वर्तन सरकार करत असल्याची टीकाही जाधवांनी केली. “अधिवेशनाचे रूपांतर केवळ औपचारिकतेत झाले आहे,” असा आरोप त्यांनी केला.राज्यातील राजकीय तापमान वाढलेले असताना विरोधी पक्षनेतेपदाचा प्रश्न किती काळ प्रलंबित राहणार आणि सरकार यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0