रिसोड,
electricity supply protest तालुयातील पळसखेड व बिबखेड येथील शेतकर्यांनी आठ तासा ऐवजी बारा तास व सुरळीत वीज देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी यांच्याकडे केली आहे.
निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, पळसखेड व बिबखेड शेतशिवाराला करडा फिडर वरून वीज जोडणी केली आहे. परंतु, या फिडर वरून आठ तास पूर्णपणे व सुरळीत लाईन मिळत नाही. वेळापत्रक वारंवार बदलतो, वेळापत्रकानुसार वीज पुरवठा चालू किंवा बंद होत नाही त्यामुळे शेतकर्यांना विजेपासून धोका होण्याची शयता नाकारता येत नाही. तसेच कधी रात्री तर कधी दिवसा वीज पुरवठा असल्यामुळे शेतीला पाणी देणे अडचणीचे झाले आहे. काही शेतकर्यांची पिके तर सुकण्याच्या मार्गावर आहेत. आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे अधिकच भर पडली आहे. तरी येथील शेतकर्यांना आठ तासाऐवजी १२ तास व नियमित वीज पुरवठा करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन वीज वितरण कंपनीला देण्यात आले आहे.
यावेळी अर्जुन पाटील खरात, राजू खांबलकर, हिरामण खरात, सखाराम शिंदे, राजू खरात, प्रकाश गरजे, दिलीप पाटील, किशोर पाटील, गणेश खरात, प्रशांत खरात, श्रीहरी अवताडे, शंकर शिंदे यांच्यासह पळसखेडा व बिबखेडा येथील ३० ते ४० शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.