वर्धेत सर्वशाखीय ब्राह्मण समाजाचा राज्यस्तरीय उप-वरवधू परिचय मेळावा

08 Dec 2025 18:32:54
वर्धा,
Wardha Brahmin community, ब्राह्मण सभा तथा स्नेहालय वर्धा यांच्या संयुत वतीने रविवार ४ जानेवारी २०२६ रोजी सर्वशाखीय महाराष्ट्रीयन ब्राह्मण उप-वरवधू परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. वर्धेतील वरवधू परिचय मेळाव्यात ३४ वर्षांपासुन महाराष्ट्रातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातील महाराष्ट्रीय मराठी भाषिक उप-वरवधूंचा मोठ्या प्रमाणात या मेळाव्यात सहभाग असतो. रितसर नोंदणी झालेल्या सर्वांना मेळाव्याचे अनुषंगाने मुला-मुलींच्या रंगीत फोटोसह व विस्तृत माहितीसह प्रकशित होणारी प्रथम यादीची छापील प्रत मेळाव्यात प्रत्यक्ष अथवा मेळाव्यानंतर लगेच स्पीड पोस्टने मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 

Wardha Brahmin community,
गुढीपाडवा दरम्यान पुरवणी यादीची द्वितीय पुस्तिका प्रकाशित होणार आहे. ही यादी पीडीएफ स्वरूपात संबंधितांना त्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे. विवाह योग लवकर जुळून येण्याच्या दृष्टीने या क्षेत्रात सूर्वदूर कार्यरत असलेल्या अनेक संस्थाना व व्यतींना या याद्या पाठविण्यात येतात. मेळाव्याची कार्यपद्धती, प्रत्यक्ष संपर्क व सहकार्य यामुळे विवाहेच्छूकांना एक विश्वासार्ह दालन या उपक्रमाद्वारे उपलब्ध झाले आहे. तसेच एकाच ठिकाणी अनेक अनुरूप स्थळाची माहिती उपलब्ध होत असल्याने दरवर्षी मेळाव्याच्या अनुषंगाने बहुसंख्य विवाह जुळून येतात. विलास कुळकर्णी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या ब्राह्मण सभेचा वरवधू परिचय मेळावा महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यात ओळखल्या जातो. मेळाव्यात नोंदणीसाठी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष व मेळावा संयोजक विलास कुळकर्णी, जनता चौक, रामनगर (९८२२२३३९१३) अथवा प्रकाश परसोडकर पोद्दार बगीचा शास्त्री चौक (९८६०२८५७०५) वर्धा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विलास कुळकर्णी व कार्यकारिणी मंडळानेे केले आहे.
Powered By Sangraha 9.0