सहा महिन्याचे प्रेम, संबंध आणि....

09 Dec 2025 10:15:44
लंडन,
American student kills girlfriend लंडनमध्ये एका अमेरिकन विद्यार्थ्याने आपल्या प्रेयसीची हत्या केली आहे, ज्यामागे वैयक्तिक स्वच्छतेच्या नियमांवरून होणारा वाद असल्याचे उघड झाले आहे. गोल्डस्मिथ्स विद्यापीठात शिकणारा जोशुआ मायकेल्स या अमेरिकन विद्यार्थ्याला त्याची चिनी प्रेयसी झे वांग याची हत्या केल्याचा दोषी ठरवण्यात आला आहे. २०२४ मध्ये मायकेल्सने वांगच्या लंडन फ्लॅटमध्ये तिला चाकूने वार करून ठार केले. पोलिस तपासात असे समोर आले की, मायकेल्स आणि वांग सहा महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांनी फक्त एकदाच लैंगिक संबंध साधला होता. वांगला जर्मोफोबिया असल्याने तिच्या नियमांनुसार सेक्स करताना अनेक स्वच्छतेच्या सूचनांचे पालन करावे लागले. तिच्या सूचनांमध्ये घर कसे स्वच्छ करावे, सोफा कसा वापरावा, शरीराची स्वच्छता कशी राखावी यासारख्या गोष्टींचा समावेश होता.
हेही वाचा: टी-२० कर्णधारपद शुभमन गिलला द्यावे! 
 
American student kills girlfriend
 
पहिल्या लैंगिक संपर्कानंतर वांगला पुरळ उठल्याने तिने मायकेल्सला पुन्हा चाचणी करण्यास सांगितले, ज्यास मायकेल्सने नकार दिला. यामुळे वांगने त्याच्यावर आपले जीवन धोक्यात टाकल्याचा आरोप केला आणि विद्यापीठात तक्रार करण्याची धमकी दिली. हत्येच्या दिवशी, मायकेल्स वाद मिटवण्यासाठी वांगच्या घरी गेला, मात्र भांडण अधिक तीव्र झाले. मायकेल्सने दावा केला की वांगने त्याच्यावर चाकूने हल्ला केला, त्यानंतर दोघांमध्ये संघर्ष झाला. शवविच्छेदन अहवालानुसार वांगचा मृत्यू डोक्यात चाकूच्या वारामुळे आणि गळ्याच्या दाबामुळे झाला.
 
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, जर मायकेल्सने त्वरित रुग्णवाहिका बोलावली असती आणि वडिलांना वकीलासाठी बोलावले नसते, तर वांगचा जीव वाचू शकला असता. शिकागो, इलिनॉय येथील जन्मस्थान असलेला मायकेल्स अमेरिकेत चित्रपट निर्मितीचा अभ्यास केला असून गोल्डस्मिथ्समध्ये पदव्युत्तर पदवी घेत लंडनमध्ये होता. वांग या विद्यापीठात सर्जनशील लेखनाची अभ्यासिका होती. दोघांची ओळख कॅम्पसमध्ये झाली आणि २०२३ मध्ये त्यांच्यात अनऑफ नाते सुरू झाले होते.
Powered By Sangraha 9.0