सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड

09 Dec 2025 16:12:34
मुंबई,
Big fall in the stock market देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण नोंदली गेली. व्यवहार संपताना बीएसई सेन्सेक्स ४३६.४१ अंकांनी घसरून ८४,६६६.२८ वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी १२०.९० अंकांची घसरण नोंदवत २५,८३९.६५ वर स्थिरावला. मागील सत्रातही बाजाराने मोठी पडझड अनुभवली होती. सोमवारी सेन्सेक्स ६०९ अंकांनी आणि निफ्टी २२५ अंकांनी कोसळला होता. फेडरल रिझर्व्हचा १० डिसेंबरला होणारा महत्त्वाचा निर्णय लक्षात ठेवून गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
 

Stock market decline 
मंगळवारी सेन्सेक्समधील ३० पैकी फक्त ८ शेअर्स हिरव्या चिन्हात बंद झाले, तर २२ शेअर्सनी घसरण नोंदवली. निफ्टी ५० मध्येही अशीच परिस्थिती राहिली—५० पैकी केवळ १७ समभाग वाढीसह बंद झाले आणि ३३ शेअर्स लाल निशाण्यात संपले. सेन्सेक्स गटात एटरनलचा समभाग सर्वाधिक २.३० टक्क्यांनी वधारला. दुसरीकडे, एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ४.६१ टक्क्यांची घट झाली. एकूणच, फेड धोरणाच्या अनिश्‍चिततेमुळे बाजारात दबाव कायम राहिला आणि गुंतवणूकदारांनी जोखीम टाळण्याचा कल दाखवला.
Powered By Sangraha 9.0