गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्या जवळ वाघीण आढळली जखमी अवस्थेत

09 Dec 2025 12:18:08
भंडारा,
gosikhurd tigress जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील धानोरी गावाजवळील गोसीखुर्द धरणाच्या (इंदिरा सागर प्रकल्प) मुख्य उजव्या कालव्यात (आरबीसी) एक वाघीण जखमी अवस्थेत आढळली.
 

gosekhurd 
 
 
स्थानिकांच्या सांगण्याप्रमाणे, आज सकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान पवनी- सावरला मार्गावर, जेथे कालवा समांतर वाहतो, त्या ठिकाणी प्रथमच एक वाघीण दिसली. मात्र ही वाघीण जखमी अवस्थेत असल्यामुळे ती हालचाल करू शकत नव्हती आणि कालव्याच्या जवळ असहाय्यपणे पडून होता. गावकऱ्यांनी ताबडतोब वन विभागाला याबाबत माहिती दिली. वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक बचाव पथक घटनास्थळी पोहोचले.gosikhurd tigress वाघिणीला ताब्यात घेत गोरेवाडा येथे पाठवण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमी वाघिणीला वाचवण्यासाठी आणि वैद्यकीय उपचार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Powered By Sangraha 9.0