नागपूर,
ladki bahin fadnavis महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेत काही बोगस लाभार्थ्यांमुळे राज्य शासनास तब्बल 32 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कबूल केले आहे. या योजनेत अपात्र लाभार्थ्यांमध्ये 26 लाख महिला आणि 14 हजार 297 पुरुषांचा समावेश असल्याची माहिती सरकारने दिली आहे. यामध्ये साडेनऊ हजार शासकीय कर्मचाऱ्याही अपात्र लाभार्थ्यांमध्ये आहेत. चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवलेल्या शासकीय कर्मचारी आणि पुरुषांकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करताना भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सभागृहात लाडक्या बहिणींच्या समस्यांबाबत मत मांडले. त्यांनी सांगितले की, महिलांची सर्वात मोठी समस्या अवैध दारू विक्री आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर शब्दांत अभिमन्यू पवारांना समज दिली आणि लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीत जोडू नका, असा इशारा दिला.