सिमेंट रोडवर पुन्हा खोदकाम

09 Dec 2025 16:41:07
नागपूर,
New Narsala नवीन नरसाळा परिसरात काही महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे आता गटार लाइन टाकण्यासाठी पुन्हा खोदकाम सुरू आहे. त्यामुळे मनपाच्या नियोजन क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “एकाच कामासाठी वारंवार खर्च का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
 
New Narsala
 
मनपाकडे निधीअभावाची तक्रार केली जाते, तर दुसरीकडे अलीकडेच झालेले काम परत फोडावे लागत असल्याने सार्वजनिक पैशांचा अपव्यय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. New Narsala या अनियोजित कामांबद्दल जबाबदारी कोणाची आणि अशा नियोजनावर नियंत्रण का नाही, असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. नागपुरातील विविध भागांत असे प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर माननीय नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा भोंगळ नियोजनावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
सौजन्य: महेंद्र वैद्य, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0