अद्ययावत यंत्रणेमुळे कामकाज गतिमान होणार

09 Dec 2025 18:40:47
नागपूर,
Asim Kumar Gupta : शहरातील नागरी विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि कार्यालयीन कामकाज अद्ययावत व कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने नगररचना कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. विभागीय आयुक्तालयातील नगर रचना कार्यालयाचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर या नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन नगर रचना विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय इंगोले, नगररचना कार्यालयाच्या सह सचिव सुलेखा वैजापूरकर, सुबराव शिंदे, विजय शेंडे, यांसह जुन्या सचिवालय इमारतीतील विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
 
 

nagara-rachan-office 
 
 
कामकाज अधिक गतिमान होणार
 
 
अपर मुख्य गुप्ता म्हणाले, नूतनीकरणामुळे नगर रचना विभागाचे कामकाज अधिक गतिमान होईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरी विकासाशी संबंधित प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि प्रभावी होतील. यावेळी त्यांनी इमारतीची पाहणी केली, तसेच म्हाडा व नगर रचना कार्यालयाच्या योजना व कामाचा आढावा घेतला. आस्थापना, लेखा, भांडार, अभ्यागत तसेच अत्याधुनिक तांत्रिक सुविधा, डिजिटल नकाशे आराखडा व्यवस्थापन प्रणाली, नागरिकांसाठी सुलभ सेवा-डेस्क, अशा विविध शाखांमध्ये आधुनिक आणि सुटसुटीत व्यवस्थांची उभारणी करण्यात आली आहे. नागरिकांना जलद, विश्वसनीय आणि पारदर्शक सेवा देणे हे या कार्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे विभागीय नगर रचनाचे सहसंचालक विजय शेंडे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0