नागपूर,
Opposition protests on the steps of the legislature हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. महाविकास आघाडीने सरकारवर आरोप करत म्हटले की राज्यात दिवसाला सरासरी आठ शेतकऱ्यांचा मृत्यू होत आहे आणि महायुती सरकार फक्त घोषणाबाजी करते, प्रत्यक्षात मात्र शेतकरी विरोधी धोरणे अमलात आहेत.
विरोधकांच्या म्हणण्यानुसार, महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले असले तरी अजूनही कर्जमाफी झाली नाही. कापसाला हमीभाव मिळत नाही, आयात कर शून्य केल्यामुळे परदेशातील कापूस भारतात पोहोचला आहे, तसेच सोयाबीन खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नाहीत आणि धान्याला देखील बोनस मिळत नाही. महाविकास आघाडीने फसवणीच्या आरोपांबरोबरच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, कापसाला आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा याची मागणी केली. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत आंदोलन केले.