कारंज्यात एमडी गोडाऊनवर छापा; तिघांना अटक

09 Dec 2025 12:42:21
कारंजा,
raid on md godown मुंबई नागपूर महामार्गावर असलेल्या कारंजा घाडगे येथे एमडी हे मादक पावडर तयार करण्याचा कारखाना असल्याची माहिती पोलिसांना मिळताच नागपूर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार येथील गोकुल सिटी परिसरात एमडी हा मादक पदार्थ तयार करून नागपूर येथे विक्रीसाठी देत असताना नागपूर पोलिसांनी नागपूर येथे तिघांना ताब्यात घेतले.
 
 
MD godown
 
चौकशीसाठी त्यांना रात्री कारंजा येथे आणण्यात आले होते. नागपूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तिघांनाही पुन्हानागपूर येथे नेले.raid on md godown दरम्यान एमडी तयार करण्याच्या संदर्भात कारंजा पोलिसांना कुठलीही माहिती नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0