सायली संजीव राजकारणात येणार?

09 Dec 2025 15:04:37
मुंबई,
Sayli Sanjeev will come to politics मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव राजकारणात प्रवेश करणार का, यावर चर्चेने रंगत घेतली आहे. मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक वर्षांपासून आपली छाप सोडणारी सायली संजीव आता राजकारणाशी निगडीत चर्चेचा विषय बनली आहे. सायली राज ठाकरेंच्या मनसेच्या भूमिका आणि विचारांची मोठी फॅन आहे. अनेकदा तिने जाहीरपणे सांगितले आहे की, ती राज ठाकरेंच्या विचारांशी सहमत आहे आणि त्यांच्यासोबत गप्पा मारायला आवडते. या पार्श्वभूमीवर तिला मनसेत प्रवेश करणार आहे का, यावर रंगलेल्या चर्चांवर सायलीने आपल्या स्पष्ट मताची व्याख्या केली आहे.
 
 
 
sayali sanjeev
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सायलीने सांगितले की, “मी अजून ठरवलेलं काही नाही. मला राजकीय विश्लेषक म्हणून काम करायला खूप आवडेल. मला एखाद्या पक्षात सक्रीय काम करण्यापेक्षा संपूर्ण राजकारणाचं विश्लेषण करायला मजा येईल. तिने पुढे सांगितले की, 2009 पासून तिला राजकारणाची गोडी लागली आहे. राज साहेबांनी मनसेची स्थापना केली तेव्हा मी वाढत्या वयात होते. त्यांचे भाषणे ऐकून मला खूप प्रेरणा मिळाली.
 
 
राज ठाकरेंची मी फॅन आहे आणि त्यांच्यासोबत गप्पा मारायला आवडतात. कलाक्षेत्रासह इतर सर्व क्षेत्रांबाबत त्यांना खूप माहिती आहे, त्यामुळे त्यांच्यासोबतच्या चर्चेतून मला खूप ज्ञान मिळते,”असे तिने नमूद केले. मराठी भाषेबाबत बोलताना सायलीने म्हटले की, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा आपण मान ठेवला तर इतर लोक देखील मान ठेवतील. समोरच्या व्यक्तीशी त्याच्या भाषेत संवाद साधणे गरजेचे आहे. आपली भाषा टिकवणे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे आणि याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे.
Powered By Sangraha 9.0