pancha parivartan संघाच्या 100 वर्षांच्या वाटचालीत समाजातील विविध घटकांनी संघाच्या विचारधारेचा स्वीकार करून एकात्मता, संस्कार व राष्ट्रीय भावनेची जपणूक करतानाच पंचपरिवर्तनाचे पालन केले तर समाज परिवर्तन होईल, असा विश्वास विदर्भ प्रांत सहसंपर्क प्रमुख अरविंद कुकडे यांनी व्यक्त केला.
रा.स्व.संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने हुडकेश्वरच्या स्वामी समर्थ सभागृहात रा.स्व. संघ अयोध्या भागाच्या वतीने प्रमुख जनसंगोष्टीचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर संस्कार भारतीचे अ.भा. मंत्री आशुतोष अडोणी, अयोध्या भाग संघचालक मनोहर सपकाळ व प्रमुख जनसंगोष्टी संयोजिका कीर्ती वनकर उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात मनोहर सपकाळ यांनी संघाच्या प्रमुख जनसंगोष्टी कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा अनुभव आणि विचार मांडले. कार्यक्रमाचे उद्दिष्ट समाजातील विविध क्षेत्रातील परस्पर संबंध व समन्वय साधणे हे असल्याचे सांगितले. संघाचे कार्य समाजाचे एकत्रीकरण साधण्याचे असून, व्यक्ती, कुटुंब व राष्ट्र यामध्ये सुसंवाद निर्माण करणे महत्त्वाचे आहे. आजचे तंत्रज्ञान, कुटुंबव्यवस्था, पर्यावरण व सांस्कृतिक आव्हानांवर चर्चा होऊन, राष्ट्रकार्याला नव्या दिशा मिळवण्यावर भर देण्यात आल्याचेही सपकाळ यांनी प्रास्ताविकात सांगितले.
अरविंद कुकडे म्हणाले की, कुटुंब व्यवस्थेतील आदर्श मूल्ये, महिलांचा सन्मान, संस्कारांची जपणूक व एकतेची भावना समाजपरिवर्तनाचे प्रमुख घटक आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगाने बदलणाèया जीवनशैलीमुळे पारंपरिक मूल्यांचे संरक्षण अधिक आवश्यक झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले.pancha parivartan समाजातील जात, भाषा, प्रांत अशा विभाजनांपलीकडे जाऊन समरसतेची भावना निर्माण करणे ही आजची गरज असल्याचे सांगितले.
वक्त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नोत्तरांचेही समाधान केले.