सूर्यकांत मोरे यांच्या वक्तव्यावर हक्कभंग प्रस्ताव!

09 Dec 2025 13:30:38
नागपूर,
Suryakant More's statement अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते सूर्यकांत मोरे यांनी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर सभेत विधानपरिषद सभागृहाला “लाल रंगाचा दुष्काळ” असे संबोधले आणि सभागृहाचे सभापती राम शिंदे यांचे अवमान करणारे वक्तव्य केले होते. यासंदर्भातील व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, विधानपरिषद सभागृहाच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सर्व माध्यमे आणि पत्रकारांना ही व्हिडिओ क्लिप पुनरप्रसारित करू नये असे स्पष्ट निर्देश दिले.
 

Suryakant More 
 
यावर आमदार प्रवीण दरेकर आणि श्रीकांत भारतीय यांनी आक्षेप घेत सूर्यकांत मोरे यांचे वक्तव्य निंदनीय, अक्षेपाहार्य आणि सभागृहाचा अवमानकारक असल्याचे सांगून हक्कभंग प्रस्ताव सभागृहात मांडला. अनिल परब, अमोल मिटकरी आणि विक्रम काळे यांनीही असे वक्तव्य केले की, लाल कार्पेटवर दुर्लक्षित व्यक्तीला त्याची जागा दाखवून सभागृहाची ताकद दाखवणे आवश्यक आहे आणि हक्कभंग प्रस्तावाचे समर्थन केले. मनिषा कायंदे, राजेश राठोड, शशीकांत शिंदे यांसह अनेक सदस्यांनी सभागृहाचा आणि सभागृहातील सर्व सदस्यांचा अवमान झाल्याचे सांगत सूर्यकांत मोरे यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी केली. या सर्व समर्थनामुळे हक्कभंग प्रस्तावाला व्यापक पाठिंबा मिळाला.
Powered By Sangraha 9.0