‘ताडोबा’च्या आणखी एका वाघिणीचा ‘सह्याद्री’त घरोबा!(व्हिडिओ)
09 Dec 2025 13:36:18
चंद्रपूर,
tigress from tadoba वन्यजीव संरक्षण आणि पश्चिम घाटातील अनुवांशिक विविधता वाढविण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने सोमवारी ‘टि 7 एफ एस 2 एफ’ नावाच्या उप-प्रौढ वाघिणीला यशस्वीपणे पकडले आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात केले स्थलांतरित केले. ‘टि 7’ ची मुलगी असलेली ‘टि 7 एफ एस 2 एफ’ ही आता सह्याद्रीत घरोबा करणार आहे. ताडोबा आणि कोलारा या दोन्ही गाभा क्षेत्रात संचार असलेल्या हा वाघिणीला पध्दतशीरपणे पकडण्यात आले. ही मोहीम सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात व्यवहार्य प्रजनन आणि लोकसंख्येची पुनर्स्थापना करण्याच्या व्यापक प्रकल्पाचा एक भाग आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्रीला पाठवणारी ही दुसरी वाघीण आहे. तिला पकडल्यानंतर पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी वाघिणीची तब्येत उत्तम असल्याचे प्रमाणित करून, आरोग्याचे सखोल मूल्यांकन केले. यशस्वी अनुकूलता आणि भविष्यातील ‘ट्रॅकिंग’ सुनिश्चित करण्यासाठी तिला ‘रेडिओ कॉलर’ बसविण्यात आले. सह्याद्रीच्या आगमनानंतर या वाघिणीला तात्पुरत्या बंदिवासात ठेवून पुढे नियंत्रितपणे निसर्गमुक्त केले जाणार आहे.
ही मोहीम ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ल मार्गदर्शनाखाली, आनंद उपसंचालक रेड्डी येल्लू यांच्या नेतृत्वात, सहायक वनसंरक्षक विवेक रमेश नातू, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल वैद्य, भाविक चिवंडे, नेमबाज अजय मराठे, जीवशास्त्रज्ञ शैलेंद्र सिंह देवरा यांनी राबवली.tigress from tadoba तर या हस्तांतरणासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे सहायक वनसंरक्षक संदेश पाटील आणि पर्यावरण तज्ज्ञ आकाश पाटील उपस्थित होते.