भटकंतीतून ऐतिहासिक ठिकाणाला उजाळा

09 Dec 2025 20:39:49
तभा वृत्तसेवा
दिग्रस,
surendra-mishra : अनेक ऐतिहासिक प्राचीन आणि आध्यात्मिक व तितकेच देखणी ठिकाणे असून त्याला आगळेवेगळे महत्त्व असून ते पडद्याआड होत चालले आहेत. तर काही ठिकाणे दुर्लक्षित झाली आहेत. अशा ठिकाणी भटकंतीच्या माध्यमातून येथील पत्रकार सुरेंद्र मिश्रा यांनी उजाळा दिला आहे. दिग्रस तालुक्यातच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यात भटकंती करून सुरेंद्र मिश्रा यांनी आजवर शंभराहून अधिक प्राचीन व ऐतिहासिक ठिकाणांचा शोध घेतला. येथील लोकांशी संवाद साधला, परिसराचा अभ्यास करून येथील चित्रीकरण केले ते समाज माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवले.
 
 
y9Dec-Hudi
 
आभासी प्लॅटफॉर्म, जिथे लोक मजकूर, फोटो, व्हिडिओ शेअर करतात, एकमेकांशी संवाद साधतात, सुरेंद्र मिश्रा यांनी विविध ऐतिहासिक प्राचीन स्थळाचे दर्शन करुन याचमुळे त्यांचे कौतुक होत आहे. मोठ्या कुतूहलाने हे सारे आपल्या मोबाईलवर पाहत आहेत, त्याला प्रतिसाद देत आहेत.
 
 
दिग्रस तालुक्यातील चिरकुटा या ठिकाणी अरुणावती आणि धावंडा नदीच्या संगमा पुढील शिव मंदिर, दारव्हा तालुक्यातील लाख खिंड या ठिकाणी असलेल्या संत श्री बाळूमामा मंदिर, आर्णी तालुक्यातील देऊरवाडी या ठिकाणी असलेले प्राचीन शिवालय, वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळनाथ तालुक्यामध्ये असलेल्या गिंभा या ठिकाणचे शिवकालीन भवानी मंदिर, वाशिम जिल्ह्याच्या अनसिंग येथील श्रुंगऋषीचे प्राचीन ठिकाण, दारव्हा तालुक्यातील हुडीचे आकर्षक मारुती मंदिर असल्याचे सांगितले.
 
 
लाडखेड येथील दक्षेश्वर, वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील अभईखेडा येथील प्राचीन भवानी मंदिर, नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील वझरा धबधबा, असे एक ना अनेक ठिकाणांवर मिश्रा पोहोचले. तेथील चित्रीकरण करून त्यांना ‘भटकंती’ या सदराखाली लोकांपर्यंत पोहोचवले. या ठिकाणी एकदा भेट द्या, असे आवाहन पत्रकार सुरेंद्र मिश्रा यांनी केले आहे.
आपल्या परिसरात अनेक प्राचीन पाऊलखुणांची संपदा विपुल प्रमाणात आहे, अशा ऐतिहासिक प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार, जनजागृती आणि या पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न असून या ठिकाणांना पुन्हा महत्त्व प्राप्त व्हावे, जेणेकरून येणाèया पिढ्यांसाठी त्यांचे पावित्र्य आणि महत्त्व टिकून राहील.
- सुरेंद्र मिश्रा
दिग्रस, जि. यवतमाळ
Powered By Sangraha 9.0