- वर्षभरात ४० हजार घरे बांधणार
- सामान्यांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण
नवी दिल्ली,
Prime Minister's Housing Scheme केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात बांधकाम क्षेत्राला चालना देण्याशिवाय सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वामी फंड-२ (एसडब्ल्यूएएमआईएच फंड-२ ) स्थापन करून १५ हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. याअंतर्गत १ लाख घरांच्या बांधकामाचे लक्ष्य निर्धारित केले असून, वर्षभरात ४० हजार घरांचे बांधकाम पूर्ण केले आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, २०२५ मध्ये आर्थिक दुर्बल घटकांतील लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी स्वामी फंड-२ मधून पैसा उपलब्ध केला जाईल. यातून वर्षभरात ४० हजार घरे बांधण्यात येणार आहे.
यापूर्वी Prime Minister's Housing Scheme प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत वर्ष २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ३ कोटी अतिरिक्त घरे बांधण्याची घोषणा केली होती. शहरांमधील गृहनिर्माण योजनेसाठी अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. केंद्र सरकारकडून पुढील ५ वर्षांसाठी २.२ लाख कोटी रुपयांचा वाटा टप्प्याटप्प्याने जारी करण्यात आला. पुढील टप्प्यात २०२५ मध्ये आणखी ४० हजार घरांचे बांधकाम पूर्ण होईल, ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना हक्काचे घर मिळेल. ही कुटुंबे गृहकर्जावर ईएमआय भरत होती. तसेच आपले विद्यमान घराचे भाडेही देत होते. आधारे स्वामी फंड-२ स्थापन करण्यात येईल. सरकार, बँका आणि खाजगी गुंतवणूकदारांच्या योगदानाने आर्थिक सुविधा उपलब्ध होणार आहे. १५,००० कोटी रुपयांच्या या निधीतून आणखी एक लाख घरे जलद गतीने बांधण्यात येईल.