- पालकमंत्र्यांकडून तांडा समृद्धी योजनेचा आढावा
- तांड्यांसाठी १५३ कामे व १५ कोटी रुपये मंजूर
यवतमाळ,
बंजारा समाजाचे वास्तव्य असलेल्या तांड्यांच्या विकासासाठी शासनाने संत सेवालाल महाराज लमाण Tanda Samriddhi Yojana तांडा समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत बंजारा, लमाण तांडा घोषित करणे, गावठाण व तांड्यांना महसुली गाव, ग्रामपंचायत घोषित करण्याची कारवाई गतीने करावी. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावे, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या. महसूल भवन येथे त्यांनी संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृद्धी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार राजू तोडसाम, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर, अशासकीय सदस्य छाया राठोड, गोवर्धन राठोड, पंजाब पवार होते.
Tanda Samriddhi Yojana तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत व सामूहिक विकासाच्या सुविधा निर्माण करून विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. गावठाण, महसुली दर्जा व ग्रामपंचायत नसलेल्या तांड्यांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावे. एकही तांडा सुटणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. जिल्ह्यातील तांड्यांच्या विकासासाठी तीन वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला त्यानुसार यावर्षी विविध विकासकामांसाठी मंजूर निधी खर्च करताना प्राधान्याची कामे आधी घेण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
Tanda Samriddhi Yojana तांड्यांना ग्रामपंचायतचा दर्जा देण्यासाठी शासनाने लोकसं‘येची अट १ हजारांवरून ७०० केली आहे. तसेच तांड्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन गावांतील अंतराची अट शिथिल करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. योजनेंतर्गत जिल्ह्यात तांड्यात करावयाची १५३ विविध विकास कामे मंजूर झाली असून यासाठी १५.३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.