महिला उद्योजकांनी आर्थिक बळ

    दिनांक :01-Feb-2025
Total Views |
- उद्योग सुरू करणार्‍या महिलांना २ कोटींपर्यंत कर्ज
- ५ लाख महिलांना होणार फायदा
 
नवी दिल्ली, 
Women entrepreneurs केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी शनिवारी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करीत लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांसाठी अनेक घोषणा केल्या. यात महिला उद्योजकांना आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे. उद्योग सुरू करणार्‍या महिलांना २ कोटीपर्यंतचे कर्ज कोणत्याही सुलभ अटींवर दिले जाणार आहे. यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.
 
 
WOMEN1
 
Women entrepreneurs महिलांसह अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लोकांना छोटे आणि मध्यम उद्योग सुरू करण्यासाठी पाच वर्षांच्या कालावधीसाठी २ कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत कर्जाची सुविधा मिळणार आहे. देशातील ५ लाख महिलांना याचा फायदा होणार आहे. महिलांना त्यांच्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी प्रशिक्षण, विपणन समर्थन आणि सरकारी योजनांशी जोडण्याची सुविधा देखील दिली जाईल. ज्या महिला पहिल्यांदाच उद्योजक बनणार आहे, त्यांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने ही योजना आणण्यात आली, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
 
स्वावलंबी बनवण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट
या योजनेंतर्गत महिलांना कोणत्याही हमीशिवाय सुलभ अटींवर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, जेणेकरून त्या स्वतःचे आणि मध्यम उद्योग सुरू करू शकतील. देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी या योजनेंतर्गत महिलांना सक्षम बनविले जाणार आहे. कर्जाचा लाभ मिळालेल्या महिला उद्योजकांनी प्रशिक्षण दिले जाणार आहे.